Saturday 27 July 2013

खेळाचे महत्व


  •                        खेळाचे महत्व
  • व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने शारीरिक क्षमता म्हणजे फक्त श्रम नव्हे तर कोणत्याही व्यवसायात दीर्घकाळपर्यंत कार्यरत राहण्याची क्षमता. व्यक्तीचे आरोग्य चांगले असेल तरच हे होऊ शकते. याचाच अर्थ आरोग्य हा व्यक्तिमत्वाचा महत्वाचा भाग आहे.
  • चांगले आरोग्य म्हणजे कोणत्याही प्रसंगी व कोणत्याही वातावरणात न थकता दीर्घकाळ काम करण्याची क्षमता. हे काम शारीरिक किंवा बौध्दिक श्रमाचे असू शकते. विेक्रेत्याला भरपूर फिरण्याकरिता शारीरीक क्षमतेची गरज असते, तर कार्यालयातील लेखापलकाकडे एका जागी बसून दीर्घकाळापर्यंत बौध्दिक श्रम करण्याची क्षमता असली पाहिजे.
  • दीर्घकाळपर्यंत काम करण्याच्या क्षमतेतून व्यक्ितमध्ये आत्मविश्र्वास निर्माण होतो. चांगल्या व्यक्तिमत्वाकरिता आत्मविश्र्वास हा एक मूलभूत गुण आहे. याशिवाय निरोगी शरीरामुळे मनाची एकाग्रतासुध्दा टिकून राहते व व्यक्ती त्या कामात कार्यकुशल बनते. याचाच अर्थ चांगले आरोग्य व्यक्ितमध्ये आत्मविश्र्वास व मनाची एकाग्रता निर्माण करते.
  • आरोग्य जोपासण्यासाठी व्यक्ितने नियमित व्यायाम करणे गरजेचे आहे. यासाठी उपलब्ध साधनांचा वापर करुन परिस्थितीनुसार कोणताही व्यायाम केला तरी चालू शकतो. त्यासाठी व्यायाम शाळेतच गेले पाहिजे असे नाही तर चालणे, पळणे, योगासने इत्यांदी साध्या व सोप्या व्यायामाने सुध्दा शारीरिक क्षमता निर्माण होते. लोकमान्य टिळकांसारख्या महान व्यक्ितने सुध्दा आरोग्याचे महत्व लक्षात घेऊन एक वर्ष फक्त शरीर कमावण्यासाठी खर्च केले होते.
  • चांगल्या शरीरदृष्टीमुळे व्यक्तीचे बाहयस्वरुप सुध्दा खूलून दिसते. चांगली शरीरयष्टी असणार्‍या व्यक्ितला कोणताही पोषाख चांगला दिसतो. व समोरच्या व्यक्तिवर त्याचा प्रभाव पडतो. नीटनेटका व चांगला पोषाख हा सुध्दा व्यक्तिमत्वाचा एक भाग आहे.
  • वरील सर्व गोष्टी पाहता शारीरिक क्षमतेसाठी नियमीत व्यायाम करणे अतिशय गरचेचे आहे.
  •  i


  • खेळ :-
  • जीवनामध्ये खेळालासुध्दा महत्व आहे. कारण शारिरीक क्षमतेबरोबरच व्यक्तितील इतर महत्वाच्या गुणांचा विकास खेळामुळे घडतो. बहुतेक लोक खेळाकडे मनोरंजन व शारीरीक व्यायाम या दृष्टीकोनातून पाहतात. खरे पाहता खेळामुळे व्यक्तितील इतर सुप्त गुण सुध्दा विकसित होत असतात. म्हणूनच व्यक्तिमत्व विकासात शारीरीक क्षमता वाढवताना खेळाला महत्व दिले पाहिजे. खेळामूळे खालील गुणांचा विकास होतो.
  • १. खिलाडू वृज्ञ्ल्त्
  • २. सांघिक वृज्ञ्ल्त्
  • ३. सहकार्य करण्याची वृज्ञ्ल्त्
  • ४. नेतृत्व .
  • ५. स्पर्धात्मक वृज्ञ्ल्त्
  • ६. एकाग्रता.
  • ७. सहनशीलता.
  • ८. आत्मविश्र्वास.
  • आहार :-
  • सुदृढ व निरोगी शरीरासाठी चांगल्या व समतोल आहाराची आवश्यकता असते. समतोल आहारात दूध, अंडी व फळभाज्या इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. तेलकट व मसालेदार पदार्थ आरोग्यास बाधक ठरतात. शारीरिक क्षमता वाढवतांना व्यायामाबरोबर व्यक्ितला अशा प्रकारच्या चांगल्या व सकस आहाराची आवश्यकता असते.
  • मानसिक क्षमता :-
  • मानसिक क्षमता म्हणजे व्यक्ितच्या मनाची शक्ती. मन म्हणजे व्यक्ितचे विचार व त्याच्या भावना. प्रत्येक व्यक्ितचे विचार व त्याच्या भावना भिन्न स्वरुपाच्या असतात. त्यामुळे प्रत्येकाची मानसिक क्षमता वेगळी असते. व्यक्तीचे विचार हे त्याच्या शिक्षण , संस्कार व अनुभवावर आधारित असतात.
  • खेळामुळे खिलाडूवृत्ती वाढीस लागते. त्याचा फायदा त्या व्यक्तीबरोबरच देशाच्या विकासासाठीही होतो. म्हणूनच जीवनात खेळाचे महत्व अनन्यसाधारण आहे, असे प्रतिपादन खासदार पियुष गोयल यांनी केले. 
  • राज्यस्तरीय किक-बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटन त्यांच्या हस्ते आज झाले. खासदार दिलीप गांधी, असोसिएशनचे अध्यक्ष सी. ए. तांबोळी, अमृतलाल बोरा, क्रीडाधिकारी अजय पवार, परेश गांधी, संतोष खैरनार, बापू घुले आदी यावेळी उपस्थित होते. येथील वाडिया पार्कमध्ये २० जुलैपर्यंत १३६ गटांत या स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत.
  • आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक स्पर्धेत यश मिळवलेले खेळाडू संजय करोडे, लक्ष्मण कोळी, उमर तांबोळी, बापू घुले यांचा, तसेच आंतरराष्ट्रीय स्पर्धेत चमकलेले नगरचे खेळाडू अश्विनी नन्नवरे, पलक गांधी, प्रवण गांधी यांचा खासदार गोयल यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
  • स्पर्धेत राज्यातील सुमारे २ हजार २०० खेळाडू सहभागी झाले आहेत. २ ते ६ ऑगस्टदरम्यान राष्ट्रीय स्पर्धेसाठीच्या खेळाडूंची निवड यावेळी केली जाणार आहे. स्पर्धेच्या यशस्वीततेसाठी संतोष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली नीलेश नरवडे, ललित लांडे, रोहित कसबे, स्वप्नील वारूळे प्रयत्नशील आहेत. सूत्रसंचालन प्रा. गीता भावे यांनी केले. आभार परेश गांधी यांनी मानले.    

  • मने दोन प्रकारची असतात. अंतर्मन व बाहयमन , अंतर्मन व्यक्तीला नेहमी खर्‍या वस्तुस्थितीची जाणीव करुन देत असते, तर बाहयमन क्षणिक सुखाचा विचार करीत असते. मनुष्य नेहमी क्षणिक सुखालाच बळी पडतो. म्हणूनच माणसाने बाहय मनापेक्षा अतर्मनाला जास्त महत्व देऊन निर्णय घेतले पाहिजेत.
  • अंतर्मन स्थिर असते पण बाहयमन चंचल असते. त्यामुळेच बर्‍याच वेळा असे दिसून येते की, निर्णय घेताना वयक्ितच्या मनाची स्थिती द्विधा बनते. अंतर्मन व बाहयमनाचे संतुलन साधून जे सकारात्मक विचार निर्माण होतात त्याला मानसिक क्षमता म्हणता येईल.
  • मानसिक क्षमता म्हणजे मानसिक संतुलन ठेवून वेळ, काळ व परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची क्षमता . उदा. युध्दामध्ये सेनापतीला परिस्थितीचा विचार करुन व मानसिक संतुलन ठेवून निर्णय घ्यावे लागतात. मानसिक क्षमतेमध्ये खालील गुणांचा समावेश होतो.
  • १. सकारत्मक विचार :-
  • हा एक मानसिक क्षमतेतील अतिशय महत्वाचा भाग आहे. कोणतेही कार्य करण्यापूर्वी प्रत्येक व्यक्ितच्या मनामध्ये त्या कार्याच्या यशाबद्दल शंका कुशंका निर्माण होतात. ज्या व्यक्ितच्या मनांमध्ये त्या कार्याच्या यशाबद्दल आशावाद असतो. त्याला सकारात्मक विचार म्हणतात. तसेच ज्या व्यक्ितच्या मनामध्ये त्या कार्याच्या यशाबद्दल शंका असते. त्याला नकारात्मक विचार म्हणतात. चांगल्या व्यक्तिमत्वाकरिता सकारात्मक विचार असणे गरजेचे आहे. सकारात्मक विचार असणार्‍या व्यक्ती आपल्या भावी जीवनात यशस्वी होताना दिसतात.
  • सकारात्मक विचार असणार्‍या व्यक्ितममध्ये दुसर्‍यास मदत करण्याची वृज्ञ्ल्त्; स्वच्छेने पुढाकार घेऊन समाज कार्य करण्याची प्रवृज्ञ्ल्त्नि:स्वार्थीपणा इत्यादी गुण असतात.
  • २. इच्छाशक्ती :-
  • कोणतेही कार्य यशस्वी करण्यासाठी दृढ नि:श्चयाची आवश्यकता असते. व्यक्ितमध्ये जेव्हा प्रबळ इच्छाशक्ती असते, त्यावेळी कोणत्याही अडचणींना धैर्याने तोंड देण्याची क्षमता त्यांच्यामध्ये निर्माण होते. या क्षमतेच्या जेरावर तो अशक्य गोष्टी ही शक्य करु शकतो. याचे ऐतिहासिक उदाहरण म्हणजे प्रखर देशक्तीने प्रेरित झालेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांनी समुद्रातील दूर अंतर पोहून स्वत:ची सुटका करुन घेतली.
  • ३. प्रयत्नशीलता :-
  • कोणतेही काम यशस्वी होण्यासाठी केवळ इच्छाशक्ती असून चालणार नाही तर त्यादृष्टीेने योग्य प्रयत्न करेण गरजेचे आहे. मात्र हे प्रयत्न स्वत:च्या सुखाचा त्याग करुन करावे लागतात. तरच त्या कार्यात यश मिळण्याची खात्री असते उदा. जगातील सर्वोच्च हिमशिखर एव्हरेस्ट हे शेरपा तेनस्ंिागने इच्छाशक्ती व प्रयत्नांच्या बळावर काबीज केले होते.
  • ४. आशावाद :-
  • जीवनामध्ये यशस्वी होण्याकरिता प्रत्येक व्यक्तीकडे आशावाद असणे गरजेचे आहे. आशावाद म्हणजे कोणतेही कार्य करण्यापूर्वी त्या कार्यात यश मिळण्याची खात्री. कार्यामध्ये आशावाद असेल तर व्यक्ती प्रयत्नशील राहते व प्रयत्नशील व्यक्तिनाच मिळते.
  • ५. सहनशीलता :-
  • एखादे कार्य करीत असताना अनपेक्षितपणे जर त्यात अपयश आले तर त्याला धैर्याने तोंड देऊन व्यक्ितने प्रयत्नशिल राहिले पाहिजे. प्रत्येक कामात व्यक्ितला पहिल्या प्रयत्नातच यश मिळेल असे समजणे चुकीचे आहे. कांही वेळा एका कामात यश मिळणेसाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करावे लागतात. याच ठिकाणी व्यक्ितच्या चिकाटी व सहनशीलतेची परीक्षा असते. सैन्यात अधिकारी व्यक्ितच्या चिकाटी व सहनशीलतेची परीक्षा असते. सैन्यात अधिकारी म्हणून भरती होण्यासाठी गेलेले कांही उमेदवार चार पाच प्रयत्नांनंतर यशस्वी झाल्याची उदाहरणे आहेत.
  • मानसिक क्षमतेतील वरील गुणांचा विचार केल्यानंतर आता आपण मानसिक क्षमता कशी विकसित क्षमता वाढविण्याकरिता पुरातन कालातील या अभ्यासाचे महत्व आता समाजाला पटू लागले आहे. म्हणूनच आता मोठमोठया आंतरराष्ट्रीय पातळीच्या कंपन्यांचे आवारात त्यांचे अधिकारी व कामगारांसाठी योग अभ्यासाकरिता स्वतंत्र सोयी केल्या जात आहेत.
  • योगाभाषांतरांवरूनयासाबरोबरच भगवतगीता व महाभारत यासाख्या पौराणिक ग्रंथाचे वाचन केल्यास वेगवेगळे प्रसंगी मनाचे संतुलन ठेऊन योग्य निर्णय कसे घेतले जातात याचे ज्ञान मिळते.
  • बौध्दिक क्षमता :-
  • शारीरीक व मानसिक क्षमतेबरोबर व्यक्तिमत्वाला बौध्दिक क्षमतेचीसुध्दा गरज आहे. बौध्दिक क्षमता म्हणजे व्यक्तीच्या बुध्दीची पातळी व विचार करण्याची क्षमता, प्रत्येक व्यक्ितच्या बुध्दिची पातळी वेगवेगळी असते. बहुतांशी हा गुण व्यक्ितकडे त्याच्या अनुवंशिकतेमधुन आलेला असतो. असे असले तरी योग्य प्रयत्न केल्यास उपजत बुध्दिचा ही विकास करता येतो.
  • बौध्दिक क्षमतेमुळे खालील गुणांचा विकास होतो.
  • १. ज्ञान आकलन करण्याची क्षमता :-
  • बंुध्दिची पातळी जर उच्च असेल तर त्याचेकडे ज्ञान आकलन क्षमतासुध्दा जास्त असते. ज्ञान आकलन करण्याकरिता विविध विषयांवरील पुस्तके अभ्यासली पाहिजेत. याशिवाय वेगवेगळया अनुभवांतून ज्ञान आकलन करणे गरजेचे आहे. वाचन व अनुभवातून मिळालेले ज्ञान व्यक्ितला त्याचे व्यक्तिमत्व घडवण्यात उपयोगी ठरते.
  • २. र्तकशुध्द विचार :-
  • र्तकशुध्द विचार म्हणजे एखाद्या गोष्टीचा कारणमीमांसेच्या आधाराने केलेला सर्वांगिण विचार होय. र्तकशुध्द विचारामुळे व्यक्तीला विचार पटवून देण्याची क्षमता येते. विचार पटवून देण्यासाठी मुद्यांची मांडणी ठराविक क्रमाने केली तरच मुद्दा पटवून देतो येतो. याशिवाय मुद्यांमध्ये शास्त्रीय प्रमाण असेल तर मुद्दा पटवून देणे जास्त सोपे जाते.
  • ३. निर्णय क्षमता :-
  • व्यक्ितने कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्यावर सर्व बाजूंनी सखोल विचार केला पाहिजे. व घेतलेल्या निर्णयाशी ठाम राहिले पाहिजे. मन छोटया मोठया अडचणीमुळे विचलीत होऊ देता कात नये. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सैन्यातील आधिकारी युध्दात त्याच्या तुकडीस एकदा हल्ल्याचे आदेश दिल्यानंतर कधीही बदल करत नाहीत मग त्यात त्याला कितीही अडचणी येवोत.
  • यातूनच त्याची निर्णय क्षमता दिसून येते व त्याच्या व्यक्तिमत्वाची एक वेगळीच प्रतिमा उमटते.
  • ४. संभाषण कला :-
  • बौध्दिक क्षमतेमध्ये संभाषण कलेला अनन्यसाधारण महत्व आहे. बुध्दिच्या जोरावर व्यक्ती भरपूर ज्ञान कमवू शकते परंतु हे ज्ञान जर प्रकट करण्याची कला त्याच्याजळव नसेल तर त्या ज्ञानाचा कांहीही उपयोग होत नाही. बुध्दी असूनसुध्दा विचार प्रकट करण्याची कला नसेल तर व्यक्तिमत्वाचा विकास चांगला होऊ शकत नाही.
  • ५. शोध प्रवृज्ञ्ल्त्;ाी :-
  • बुध्दीचा वापर दैनंदिन व्यवहारामध्ये नवनवीन शोध लावणेसाठी केला पाहिजे. यातून व्यक्ितच्या कल्पनाशक्तीचा विकास होतो. व्यक्तिमत्वामध्ये कल्पना शक्तीला अतिशय महत्व आहे. या कल्पनाशक्तीच्या जोरावर तो नवनवीन शोध लावू शकतो. विज्ञानातील विविध शोध बौध्दिक क्षमतेच्या जोरावर लागलेले आहेत. म्हणुन शोध प्रवृज्ञ्ल्त्;ाी हा बौध्दिक क्षमतेचा महत्वाचा भाग आहे.
  • ६. सारांश :-
  • बौध्दिक क्षमतेचा विकास करण्यासाठी मुख्यत्वे भरपूर वाचन आवश्यक आहे. व्यक्ितला व्यावसायिक ज्ञान व सामान्य ज्ञान असणे आवश्यक आहे. व्यावसायिक ज्ञान व्यक्ितच्या विकासाठी उपयोगी पडते तर सामान्य ज्ञान व्यवहारात कसे वागावे यासाठी उपयोगी असते. ज्ञानप्राप्ती करीत असतांना व्यक्ितने त्या त्या विषयांवरील नामवंत व अभ्यासू व्यक्िंतचे लिखाण , वाचण, संभाषणे ऐकणे आवश्यक आहे. यामुळे व्यक्ितची विचार क्षमता वाढते.
  • सामाजिक क्षमता :-
  • मनुष्य हा समाजातील महत्वाचा घटक असून तो समाजाशिवाय राहूच शकत नाही. व्यक्ती स्वत:चा विकास करीत असतांना समाजासाठी जे कांही कार्य करते त्यामुळे त्याला समाजात एक प्राकरचे वेगळे स्थान प्राप्त होते. ज्या समाजात व्यक्ती राहते त्या समाजाच्या उन्नतीकरीता त्याची काहीतरी बांधिलकली असली पाहिजे.
  • प्रत्येक व्यक्ती आपआपल्या क्षेत्रामध्ये स्वत:चा विकास करुन घेत असते व तिच्या व्यक्तिमत्वाचे मूल्यांकन त्या क्षेत्रापुरते मर्यादित असते. परंतु त्याने समाजासाठी कांही विधायक कार्य केल्यास त्याचे व्यक्तिमत्व सर्वांगिण बनते व समाजसुध्दा त्याची दखल घेतो. खरे म्हणजे समाजाकरिता कांही चांगले कार्य करणे ही त्याची नैतिक जबाबदारी आहे. ही जबाबदारी पार पाडत असतांना त्याने फलाची अपेक्षा करता कामा नये. भगवत गीतेतील कर्मण्ये वा धिकारस्ते मा फलेषू कदाचन' हा श्लोक यथार्थ आहे.
  • समाजकार्य :-
  • समाजकार्य म्हणजे समाजाच्या विकासासाठी नि:स्वार्थपणे केलेले कार्य. समाजकार्य व्यक्तिगत किंवा सार्वजनिक मदत करुन करता येते.
  • व्यक्तिगत मदत म्हणजे एका व्यक्ितने दुसर्‍या व्यक्तिसाठी केलेले नि:स्वार्थी मदत . ही मदत गरीब मुलांना कपडे वाटून, गरजू मुलांना पैशाच्या स्वरुपात, विद्याथ्र्यांना शालेय पुस्तके देऊन, निराधान मुलांना दत्ताक घेउुन करता येते. विविध संस्थांना देणगी देऊनच समाजकार्य होते असे नाही तर वर उल्लेख केल्याप्रमाणे वैयक्तिक मदत करुन सुध्दा समाजकार्य करता येते.
  • सेवाभावी संस्थांना वस्तू पुरवून व आर्थिक मदत करुन सुध्दा समाजकार्य करता येते. तसेच गाव दत्ताक घेऊनही मदत करता येते. गुजरातमधील भूकंपात उध्वस्त झालेली गावे कांही धनाढय लोकांनी दत्ताक घेतली आहे.
  • समाजातील व्यक्ितची प्रतिमा व स्थान हे त्याच्या एकूण वागण्यावरुन ठरत असते. दैनंदिन जीवनात व्यक्ितची इतरांशी असणारी वर्तुणूक तिच्या व्यक्तिमत्वाचे दृष्टीने महत्वाची ठरते. आदर्श व्यक्तिमत्वासाठी नम्रता, नि:स्वार्थी वृज्ञ्ल्त्, आदर्श विचार, मदत करण्याची प्रवृज्ञ्ल्त्; व त्याग या गुणांची आवश्यकता आहे. या सर्व गुणांमुळे व्यक्तीचे समाजातील व्यक्तिमत्व उठून दिसते.