Sunday 22 September 2013

बालकांचे खेळ :
 बालकाच्या मनावर खेळाची आवड कोणी बाहेरून लादलेली नसते; तर ती स्वयंस्फूर्तच असते. ही उपजत आवड मुलाला एका जागी स्वस्थ बसू देत नाही. त्याला काहीतरी हालचाल करायलाच लावते. जी हालचाल प्रिय, ती हालचाल मूल वारंवार करते. तसेच प्रौढांचे अनुकरण करण्याची प्रवृत्तीही मुलांमध्ये जात्याच असते. या हालचालीतून व अनुकरण-प्रवृत्तीतून खेळाचा जन्म होतो. अशा रीतीने क्रीडेकडे मुलांची स्वाभाविक ओढ असते. क्रीडा ही सर्जनात्मक सहजप्रवृत्तीतून निर्माण होणारी नैसर्गिक क्रिया आहे. प्राणिमात्रांमध्ये ती कमीअधिक प्रमाणात दिसून येते. शिकण्याची वृत्ती अधिक असलेल्या प्राण्यांत क्रीडाप्रवृत्तीही अधिक दिसते. क्रीडेतील निर्माणक्षमता ही आनंददायी असते. त्याचमुळे आबालवृद्ध खेळात रमतात. कर्तृभाव म्हणजे कर्तृत्व गाजवण्याची इच्छा, ही मुलांना खेळाकडे खेचत असते. खेळ म्हणजे मुलांच्या शिक्षणाची निसर्गाने केलेली व्यवस्थाच होय. मुलांची वाढ त्यांच्या खेळावरच अवलंबून असते. खेळ हे मनाच्या व शरीराच्या निरोगीपणाचेच लक्षण होय. खेळापासून त्यांना परावृत्त केले की, ती स्वाभाविक चिडखोर, तुसडी व एकलकोंडी बनतात. मूल खेळत नसेल तर ते निरोगी नाही, त्याच्यात जन्मजात विकृती आहे, असे मानसशास्त्र मानते.

खेळांचे अनेकविध प्रकार आहेत. त्यांत वयोमानानुसार शिशुगटाचे, बालकांचे, कुमारांचे, तरुणांचे, प्रौढांचे, वृद्धांचे असे नानाविध प्रकार आढळून येतात. प्रस्तुत नोंदीत बालकांच्या म्हणजे साधारणपणे दोन ते बारा वर्षांपर्यंतच्या मुलामुलींच्या खेळांचाच विचार फक्त अभिप्रेत आहे.
 
डीच ते पाच वर्षांच्या मुलांना बदलत्या हालचाली करणे आवडते. त्यांना नावीन्याची गोडी असते. स्वच्छंदपणाने बागडणे, खाली डोके आणि वर पाय करणे, कोलांट्या उड्या मारणे, लंगडी घालणे वगैरे खेळ ही मुले खेळतात. मुले मोठी होऊ लागली, की त्यांची कल्पनाशक्ती व चैतन्यशक्ती वाढते. या अतिरिक्त शक्तीला मोकळी वाट करून देण्याचा खेळ म्हणजे एक मार्ग असतो. कल्पनाशक्तीमुळेही मुले प्रौढांचे अनुकरण करू लागतात. उदा., ⇨ बाहुलीचा तसेच भातुकलीचा खेळ. तसेच ती नवनवीन रचना करू लागतात. उदा.,मेकॅनोचा खेळ, लहान तिचाकी सायकलवर बसून प्रौढाप्रमाणे मोटार चालविण्याचा आव आणणे, काठीचा घोडा-घोडा करणे, आगगाडीप्रमाणे झुक्-झुक् आवाज करीत पळणे इत्यादी [⟶ खेळणी]. उद्यानात गेल्यावर ही मुले घसरगुंडी, झोके,‘सी-सॉ,’‘पिरॅमिड’,‘मेरी-गो-राउंड’ यांसारख्या क्रीडासाधनांच्या साहाय्याने खेळतात. कालांतराने ह्या खेळातही त्यांना स्वारस्य वाटत नाही. आठ ते बारा वर्षांपर्यंत त्यांची शारीरिक उंची वाढू लागते आणि त्याचबरोबर त्यांच्या आवडी-निवडींमध्येही फरक पडतो. शौर्याचे, कौशल्याचे खेळ त्यांना आवडू लागतात. त्यामुळे मुले आपापसांत मारामाऱ्यांचे खेळ, लुटुपुटीच्या लढाया व शिकारीचे खेळ खेळतात. त्यातून नकळत भावी आयुष्यासाठी त्यांची बचाव व आक्रमणाची पूर्वतयारीच होत असते. याच काळात ईर्षा व स्पर्धा या वृत्तीही वाढीस लागतात आणि मुले रस्सीखेच, कुस्ती हे खेळ अधिक पसंत करतात. रांगत्या वयात फिरता भोवरा पाहण्यात मौज वाटत होती, आता त्यांना आपल्या हातांनी ⇨भोवरा फिरवल्याशिवाय चैन पडत नाही. काही मुले ⇨पतंगाचे पेच घालू लागतात, तर त्याचवेळेला इतर मुले कुस्तीचे पेच सोडवतात. पूर्वी चेंडूशी खेळणारी मुले आता क्रिकेटचे धडे गिरवू लागतात. मुलींचे मन सागरगोटे, दोरीवरच्या उड्या, झिम्मा, फुगडी, नृत्य यांसारख्या खेळांकडे नैसर्गिक रीत्याच आकृष्ट होते.
 
शा रीतीने तान्ह्या मुलाला खुळखुळा, रांगणाऱ्याला भोवरा, उभे राहणाऱ्याला पांगुळगाडा, दंगेखोर मुलाला चाक फिरवणे, गाऱ्या गाऱ्या भिंगोऱ्या करणे व गाडा ओढणे या खेळांबद्दल ओढा वाटू लागतो आणि या खेळांतूनच बालकांचे वय वाढत असते. भोवतालच्या परिस्थितीशी संबंध येताच मुलाला लाकडी घोड्यावर बसण्यात गोडी वाटत नाही, तर तो खऱ्या घोड्यावर बसण्यासाठी धडपडतो. हळूहळू वाढत्या वयातील खेळांत नियमबद्धता, व्यवस्थितपणा येऊ लागतो.
 
ल्ली शिक्षणात खेळांना महत्त्वाचे स्थान प्राप्त झालेले आहे. त्यामुळे दोन ते बारा या वयोगटांतील मुलांना त्यांच्या मनोवृत्तींनुसार निरनिराळे खेळ शिकविले जातात. साधारणपणे पाच वर्षांच्या मुलामुलींना एकत्रित टाळ्यांचे खेळ, सांघिक गाणी व छोटी छोटी नृत्ये शिकवली जातात. सहाव्या वर्षी टिपरी, लेझीम यांसारखे खेळ; तर सातव्या वर्षी लेझीमचे पुढचे हात, कवायती व अधिक कौशल्ययुक्त नृत्ये शिकवली जातात. या शैशवावस्थेत तालबद्ध व गतिमान खेळांची मुलांना स्वाभाविक आवड असते. आठव्या-नवव्या वर्षापासून मात्र मुलांना चुरशीच्या स्पर्धात्मक खेळांची गोडी लागते. अशा रीतीने चौथ्या इयत्तेत म्हणजे साधारणतः आठव्या वर्षापासून मुले स्पर्धात्मक खेळ चांगल्या प्रकारे खेळू शकतात. या वयात मुलांना काठीच्या कवायती व संचलने, नमस्कार,⇨योगासने व अन्य व्यायामप्रकार वगैरेंचे शिक्षणही दिले जाते. याचवेळी मुलांचे संघ करून त्यांना नियमबद्ध चुरशीचे सांघिक खेळ शिकवले जातात.

       धोनीने उघड केलं विजयाचं गुपित!


इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी क्रिकेट आणि बिझनेस गेम सध्या एकत्र खेळतांना दिसतोय. एका वृत्तपत्राच्या सर्वेनुसार रिती स्पोर्टस् मॅनेजमेंट कंपनीमध्ये धोनीची १५ टक्के भागीदारी आहे.
पाहा व्हिडिओ- http://goo.gl/gqeef

 


team-d

तिरंगी एकदिवसीय मालिकेतील अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात भारताला शेवटच्या षटकात विजय मिळवून देणाऱ्या 'कॅप्टन कूल' धोनीने टीम इंडियाच्या विजयाचं गुपित अखेर उघड केलं आहे. 'कमी धावसंख्येचा पाठलाग करताना, कधी कधी कंटाळवाणं (बोरिंग) क्रिकेटही खेळावं लागतं, पण यामुळेच टीमचा विजय निश्चित झाला.' असं धोनी म्हणाला.

धोनी म्हणतो, 'मी ४९ व्या षटकामध्ये एक-एक धाव काढण्यापासून स्वत:ला रोखत होतो. जर मला शेवटचा चेंडू खेळावा लागला असता आणि मी जर एक धाव काढू शकलो नसतो, तर मात्र इशांतवर दबाव वाढला असता त्यामुळे मला शेवटच्या षटकात स्वत:लाच धावा कराव्या लागणार होत्या हे स्पष्ट होतं.'

धोनीने आपल्या तळाच्या फलंदाजांचे मात्र कौतुक केलं आहे. 'तळाचे फलंदाज जास्त धावा करू शकले नाही. मात्र त्यांनी अनेक चेंडूंचा सामना केला आणि हेच फार महत्त्वाचं होतं. यात सगळ्यात जास्त श्रेय हे भुवनेश्वरला जातं, त्याने जवळजवळ मलिंगाच्या १० चेंडूंचा सामना केला. त्यामुळे मागील फलंदाजांना त्याच्या चेंडूंचा सामना करावा लागला नाही. हा सामना फारच उत्कृष्ट होता.' तळाच्या फलंदाजांच्या साथीमुळे हा विजय साकारल्याचे धोनी मान्य करतो.

धोनीने सलामीवीर रोहित शर्माचेही कौतुक केलं आहे. त्याच्या कामगिरीवर धोनी खूश असल्याचे सांगतो. 'रोहितचे प्रदर्शन पाहून फार चांगलं वाटलं. मात्र काही फटके मारताना त्याने स्वत:ला आवर घालायला हवा. तो जेव्हा धावा करतो, तेव्हा मधल्या फळीच्या खेळाडूंवर दबाव येत नाही.' असं म्हणतं हा टीमचा विजय असल्याचे सांगितले धोनीने सांगितले. धोनीने त्याच्या नावाला साजेशी कामगिरी या मालिकेत पुन्हा एकदा करून दाखवली आणि भारताला विजयाची चव चाखवली.
भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा 'हेलिकॉप्टर शॉट' पाहणे ही क्रिकेट प्रेमी आणि धोनीच्या चाहत्यांसाठी पर्वणीच असते. पण धोनीला हा प्रकार त्याच्या ज्या मित्रानं शिकवला तो सध्या आजारी आहे. हे समजताच धोनी त्याच्या मदतीसाठी पुढे आला आहे. आपल्या मित्रासाठी हवी ती मदत देण्याची तयारी धोनीनं दाखवली आहे.

महेंद्रसिंग धोनीला 'हेलिकॉप्टर शॉट' खेळायला शिकवणा-या या मित्राचं नाव संतोष लाल आहे. संतोष लाल हा रणजी क्रिकेटपटू आहे. त्याला गंभीर आजार झाला असून सोमवारीच त्याला दिल्लीतील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हे समजताच धोनीने माजी प्रशिक्षक चंचल भट्टाचार्य यांच्याकडे फोनवर त्याच्या तब्येतीची विचारणा केली. तसेच आवश्यक असेल ती सर्व मदत आपण करायला तयार आहोत, असेही धोनीने भट्टाचार्य यांना सांगितले. धोनीसोबतच अन्य मित्रांनीही संतोष लालला मदत करणार असे सांगितले आहे. त्यांनी एकत्र येऊन काही पैसेही जमा केले आहेत, असेही भट्टाचार्य म्हणाले. झारखंड क्रिकेट संघाने एक लाख रुपयाची मदत केली तर संघातील सदस्यांनी ३९,५०० रुपयांची मदत दिली आहे. धोनी संतोष सोबत रणजी ट्रॉफीत खेळला आहे आणि हेलिकॉप्टर शॉट देखील मी संतोष कडूनच शिकलो होतो, असे धोनीने सांगितले आहे.

Monday 9 September 2013

              मी राजकारणी नाही, खेळाडू आहे – सचिन तेंडुलकर


पुणे, दि. 1 (प्रतिनिधी) - राज्यसभेसाठी राष्ट्रपतींनी माझ्या नावाची केलेली शिफारस हा माझा सन्मान आहे. परंतु मी खासदारकी स्वीकारली याचा अर्थ मी राजकारणात प्रवेश केलेला नाही. मी राजकारणी नाही, तर खेळाडू आहे आणि अखेरपर्यंत खेळाडूच राहणार, असा स्ट्रेट ड्राइव्ह विक्रमादित्य क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याने आज लगावला.
सचिन तेंडुलकरच्या राज्यसभेवरील नियुक्तीवरून सध्या उलटसुलट वादविवाद रंगला आहे. या पार्श्वभूमीवर सचिनने आज प्रथमच प्रतिक्रिया व्यक्त केली. शतकांचे महाशतक ठोकल्याबद्दल पुण्यातील एका बिल्डरच्या वतीने सचिन आज जाहीर सत्कार करण्यात आला, त्याप्रसंगी प्रकट मुलाखतीत तो बोलत होता. शतकांची सेन्चुरी हा माझ्या आयुष्यातील सर्वाधिक आनंदाचा क्षण नव्हता. तर भारतासाठी वर्ल्ड कप जिंकणे हे माझे स्वप्न होते. गेल्यावर्षी ज्यावेळी भारताने वर्ल्ड कप जिंकला, तो माझ्यासाठी सर्वात आनंदाचा क्षण होता, असेही सचिनने यावेळी स्पष्ट केले.
राज्यसभेची खासदारकी हा माझ्यासाठी बाऊन्सर होता. खरे तर तो मोठा सन्मान आहे. लतादीदी, पृथ्वीराज कपूर यांच्यासारख्या दिग्गजांप्रमाणे राष्ट्रपतींनी माझ्या नावाची शिफारस राज्यसभा खासदारकीसाठी करावी, हा माझा गौरव आहे. तुम्ही तुमच्या क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ही संधी दिली जाते, तेव्हा तो तुमचा सन्मान असतो. त्यामुळे राज्यसभा खासदारकी मिळाल्यानंतर मला आनंद झाला. परंतु मी काही राजकारणी नाही. मी खेळाडू आहे आणि क्रिकेट हेच माझे विश्व आहे. मी क्रिकेट अजिबात सोडणार नाही. अगदी जसे शक्य आहे, तसे मी क्रिकेटसाठी योगदान देत राहीन, अशी पुस्तीही सचिनने यावेळी जोडली.
याआधी मला वायुदलाने ग्रूप कॅप्टन हा बहुमान दिला होता. पण मी अद्यापही एकदाही विमान उडवलेले नाही. तसेच मला मिळालेली खासदारकी म्हणजे काय ? हे मी नीट जाणतो. त्या जबाबदारीची मला पूर्ण जाणीव असून ती पूर्ण करण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन, असेही सचिनने सांगितले. सचिन म्हणाला की, जगण्याच्या पत्येक टप्प्यावर नवनवीन आव्हाने असतात. त्यामुळे तुम्ही सदैव तणावाखाली असता. अशा तणावात काम करणे हेच कौशल्य असून मला विश्वास आहे की, अशा परिस्थितीतही माणूस १० पैकी ८ गूण मिळवू शकतो. मी तरुण पिढीला एवढेच सांगेन की, त्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रीत करावे. मी नववीपासून क्रिकेट खेळू लागल्याने शिक्षण पूर्ण करू शकलो नाही. पण शिक्षण ही यशाची गुरुकिल्ली आहे.