Sunday 22 September 2013


       धोनीने उघड केलं विजयाचं गुपित!


इंडियाचा कॅप्टन महेंद्रसिंग धोनी क्रिकेट आणि बिझनेस गेम सध्या एकत्र खेळतांना दिसतोय. एका वृत्तपत्राच्या सर्वेनुसार रिती स्पोर्टस् मॅनेजमेंट कंपनीमध्ये धोनीची १५ टक्के भागीदारी आहे.
पाहा व्हिडिओ- http://goo.gl/gqeef

 


team-d

तिरंगी एकदिवसीय मालिकेतील अटीतटीच्या झालेल्या अंतिम सामन्यात भारताला शेवटच्या षटकात विजय मिळवून देणाऱ्या 'कॅप्टन कूल' धोनीने टीम इंडियाच्या विजयाचं गुपित अखेर उघड केलं आहे. 'कमी धावसंख्येचा पाठलाग करताना, कधी कधी कंटाळवाणं (बोरिंग) क्रिकेटही खेळावं लागतं, पण यामुळेच टीमचा विजय निश्चित झाला.' असं धोनी म्हणाला.

धोनी म्हणतो, 'मी ४९ व्या षटकामध्ये एक-एक धाव काढण्यापासून स्वत:ला रोखत होतो. जर मला शेवटचा चेंडू खेळावा लागला असता आणि मी जर एक धाव काढू शकलो नसतो, तर मात्र इशांतवर दबाव वाढला असता त्यामुळे मला शेवटच्या षटकात स्वत:लाच धावा कराव्या लागणार होत्या हे स्पष्ट होतं.'

धोनीने आपल्या तळाच्या फलंदाजांचे मात्र कौतुक केलं आहे. 'तळाचे फलंदाज जास्त धावा करू शकले नाही. मात्र त्यांनी अनेक चेंडूंचा सामना केला आणि हेच फार महत्त्वाचं होतं. यात सगळ्यात जास्त श्रेय हे भुवनेश्वरला जातं, त्याने जवळजवळ मलिंगाच्या १० चेंडूंचा सामना केला. त्यामुळे मागील फलंदाजांना त्याच्या चेंडूंचा सामना करावा लागला नाही. हा सामना फारच उत्कृष्ट होता.' तळाच्या फलंदाजांच्या साथीमुळे हा विजय साकारल्याचे धोनी मान्य करतो.

धोनीने सलामीवीर रोहित शर्माचेही कौतुक केलं आहे. त्याच्या कामगिरीवर धोनी खूश असल्याचे सांगतो. 'रोहितचे प्रदर्शन पाहून फार चांगलं वाटलं. मात्र काही फटके मारताना त्याने स्वत:ला आवर घालायला हवा. तो जेव्हा धावा करतो, तेव्हा मधल्या फळीच्या खेळाडूंवर दबाव येत नाही.' असं म्हणतं हा टीमचा विजय असल्याचे सांगितले धोनीने सांगितले. धोनीने त्याच्या नावाला साजेशी कामगिरी या मालिकेत पुन्हा एकदा करून दाखवली आणि भारताला विजयाची चव चाखवली.
भारताचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा 'हेलिकॉप्टर शॉट' पाहणे ही क्रिकेट प्रेमी आणि धोनीच्या चाहत्यांसाठी पर्वणीच असते. पण धोनीला हा प्रकार त्याच्या ज्या मित्रानं शिकवला तो सध्या आजारी आहे. हे समजताच धोनी त्याच्या मदतीसाठी पुढे आला आहे. आपल्या मित्रासाठी हवी ती मदत देण्याची तयारी धोनीनं दाखवली आहे.

महेंद्रसिंग धोनीला 'हेलिकॉप्टर शॉट' खेळायला शिकवणा-या या मित्राचं नाव संतोष लाल आहे. संतोष लाल हा रणजी क्रिकेटपटू आहे. त्याला गंभीर आजार झाला असून सोमवारीच त्याला दिल्लीतील एका हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हे समजताच धोनीने माजी प्रशिक्षक चंचल भट्टाचार्य यांच्याकडे फोनवर त्याच्या तब्येतीची विचारणा केली. तसेच आवश्यक असेल ती सर्व मदत आपण करायला तयार आहोत, असेही धोनीने भट्टाचार्य यांना सांगितले. धोनीसोबतच अन्य मित्रांनीही संतोष लालला मदत करणार असे सांगितले आहे. त्यांनी एकत्र येऊन काही पैसेही जमा केले आहेत, असेही भट्टाचार्य म्हणाले. झारखंड क्रिकेट संघाने एक लाख रुपयाची मदत केली तर संघातील सदस्यांनी ३९,५०० रुपयांची मदत दिली आहे. धोनी संतोष सोबत रणजी ट्रॉफीत खेळला आहे आणि हेलिकॉप्टर शॉट देखील मी संतोष कडूनच शिकलो होतो, असे धोनीने सांगितले आहे.

No comments:

Post a Comment